‘समाजवादी शिव्यांचा शोध’ : समाजवादी माणसेच आहेत, ती संतापणार व इतरांची अवहेलना करावीशी त्यांना वाटणारच. तेव्हा त्यांनी शिव्या जरूर द्याव्यात, पण... 

समाजवाद्यांनी कोणत्या शिव्या द्याव्यात? समाजात जबाबदारीने राहणाऱ्या मानवी व्यक्तीचे माणूस म्हणून महत्त्व हा समाजवादी तत्त्वज्ञानाचा व नैतिकतेचा पाया आहे. म्हणून एखादा कमी आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्या वर्तनातला कमीपणा दाखवणे हीच फक्त समाजवाद्यांना परवानगी आहे. व्यक्तिगत अवगुण दर्शवून अवहेलना हीच शिव्या देण्याची योग्य पद्धत आहे. व्यक्तीचे वर्तन समजून घेऊन, मग त्यातील वैगुण्यावर आघात करावा.......